Kolhapur Crime News : अनैतिक संबंधाच्या नात्याचा भयावह अंत, प्रियकरानेच आवळला महिलेचा गळा; म्हशीच्या गोठ्यात जे घडलं…

Kolhapur Crime News : अनैतिक संबंधाच्या नात्याचा भयावह अंत, प्रियकरानेच आवळला महिलेचा गळा; म्हशीच्या गोठ्यात जे घडलं…

भिवंडी : अनैतिक संबंधातून एका विधवा सरपंच महिलेची गळा दाबून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी भिवंडीत घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला आहे. सुरेखा शिवाजीने न्यारे (वय 40, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा : Pune Crime : धक्कादायक! दोन सख्ख्या बहिणींवर 60 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार; बळजबरीने घरी नेले अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विधवा महिला सुरेखा न्यारे आणि हत्या करणारा प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यासोबत मृत महिलेने प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावून धमकावत होती. या रागातून प्रकाश पाटील याने 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावातील शेतात म्हशीच्या गोठ्यात नेऊन गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रकाश पाटील हा हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इको कारच्या डिक्कीत ठेवून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील आपल्या नातेवाईकांकडे मंगळवारी पहाटे आला. येथे सकाळी नातेवाईकाला या हत्येबाबत समजताच त्याने या धक्कादायक घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना दिली. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी प्रकाश पाटील या ताब्यात घेतले. मृतदेहाचे शवविच्छेदन भिवंडी येथे करून मृतदेह कोल्हापूर येथे रवाना केला असून आरोपी प्रकाश विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तो कोल्हापूर येथे वर्ग केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version