Maharashtra 7/12 Utara : सातबारावर नाव नसलेल्या 2.31 लाख शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

Maharashtra 7/12 Utara : सातबारावर नाव नसलेल्या 2.31 लाख शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांचा 'ॲग्रीस्टॅक' मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यामध्ये सध्या तब्बल 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांचे 'ॲग्रीस्टॅक' निघत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. राज्यात सुमारे 50 हजार शेतकरी मृत आहेत. ज्यांच्या नोंदी अद्ययावत नाहीत. 10 हजार प्रकरणांमध्ये जमीन वडिलांच्या नावे असून, मुलाचे नाव अद्याप सातबारावर लागलेले नाही. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या 'कबुलायतदार' जागांवर सरकारचे नाव लावण्यात आले आहे.   

हेही वाचा : Maharashtra Politics : दिल्लीत राजकीय भूकंप? महाराष्ट्र सदनातील बैठक सोडून सुप्रिया सुळे अन् विनोद तावडे एकाच गाडीने रवाना

परिणामी, अशा शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही आणि घेतलेल्या कर्जाला कर्जमाफीचा लाभही मिळत नाही. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,207 शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' अद्याप निघालेले नाहीत. तर राज्यातील ही संख्या 2 लाख 31 हजार आहे. या सर्व अडचणींची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे शेतकरी आहेत. परंतु त्यांचे नाव सातबारा किंवा इतर अधिकारात नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठविण्यात येतील, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यासाठी एक स्वतंत्र फॉरमॅट तयार करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 दिवसांत अहवाल मागविण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतचे अंतिम आदेश निर्गमित केले जातील, असे त्यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version