इंडिया आघाडीच्या बैठकीवर फडणवीसांची टीका

इंडिया आघाडीच्या बैठकीवर फडणवीसांची टीका

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. इजा आघाडीची आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून, तिसरी बैठक मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये पार पडत आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीसाठी अद्याप समन्वयकसुद्धा ठरलेला नाही. मात्र इंडियातील पाच पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान पदावर दावा केला आहे. मात्र यावरूनसुद्धा मतभेद आहेत. त्यांनी कितीही ठरवले तरी जनतेला ते पटले पाहिजे. मोदी यांच्या तोडीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही. एखाद्याचे नाव ठरवले तरी जनतेला पटायला हवे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ आघाडीवर टिका केली.

स्वतःची बंद होत असलेली राजकीय दुकानदारी वाचवण्यासाठी विरोधकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध आहे. याकरिता विरोधकांनी ‘इंडिया‘ नावाची आघाडी तयार केली असून त्यांच्या दुसरा कुठलाही अजेंडा नाही. ‘इंडिया’ आघाडीत ८८ राजकीय पक्ष सहभागी झाले तरी लोकांच्या मनातून मोदी यांना काढणे कुणालाही शक्य नाही. नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने झपाट्याने प्रगती केली. विदेशातही मोदी यांच्या नेतृत्वाचा डंका वाजत आहे. गरीब कल्याणाचा ते अजेंडा राबवत असल्याने प्रत्येकाच्या मनात मोदी यांनी घर केले आहे.

दुसरीकडे विरोधकांचे भ्रष्टाचाराचे दुकान बंद होत चालल्याने त्यांना कुठल्याही परिस्थिती मोदी यांना सत्तेतून बाहेर करायचे आहे. त्याकरिता आजवर कधीच एकमेकांचे तोंडही बघत नसलेले नेते मांडीला मांडी लावून बसले आहे. त्यांना गरिबी हटवायची नाही तर आपले बंद होणारे राजकीय दुकान वाचवायचे आहे, असाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आघाडीच्या नावावर सर्वच पक्ष स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरिता बॅनर, पोस्टरबाजी केली जात आहे. ‘इंडिया’च्या कितीही बैठका घेतल्या आणि एकत्रित निवडणूक लढल्या तरी कुठलाही परिणाम देशाच्या राजकारणावर होणार नाही, असाही दावा यावेळी फडणवीस यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version