Vikhroli Hotel Viral Video : मुंबईत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार! जेवण बनवण्याच्या भांड्यातच कर्मचाऱ्याची आंघोळ; VIDEO व्हायरल

विक्रोळी टागोर नगरमधील ‘बॉम्बे फ्युजन’ हॉटेलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण बनवण्याच्या भांड्यात कर्मचाऱ्याने आंघोळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Vikhroli Hotel Viral Video : मुंबईत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार! जेवण बनवण्याच्या भांड्यातच कर्मचाऱ्याची आंघोळ; VIDEO व्हायरल

विक्रोळी टागोर नगरमधील बॉम्बे फ्युजन हॉटेलचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या किचनमध्ये ग्राहकांसाठी जेवण बनवले जाते आणि ज्या भांड्यांचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो, त्याच भांड्यात हॉटेलमधील एक कर्मचारी आंघोळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यातच एका कर्मचाऱ्याने आंघोळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा- Oracle India Layoffs: IT क्षेत्रात मोठी नोकरकपात; ओरॅकल भारतातून 3,000 कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचारी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भांड्यात आंघोळ करताना दिसत असून, त्याच भांड्यात तो कपडे देखील धुत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची स्वच्छता, स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांची स्वच्छतेची पद्धत आणि खाद्यपदार्थ तयार करताना पाळल्या जाणाऱ्या नियमांवरही आता चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडिओमुळे हॉटेलच्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, संबंधित कर्मचाऱ्याने वापरलेलं भांडं प्रत्यक्षात अन्न तयार करण्यासाठी वापरलं जात होतं का आणि या प्रकाराबाबत हॉटेल प्रशासनाची भूमिका काय आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version