वीजग्राहकांवर दरवाढीची टांगती तलवार

वीजग्राहकांवर दरवाढीची टांगती तलवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वीजग्राहकांची भारनियमनातून सुटका झालेली असली तरी, या ग्राहकांना दरवाढीचा भार मात्र, उचलावा लागण्याची शक्यता आहे. महावितरणाने सर्वसाधारण ग्राहकांच्या वीजबिलात चार टक्के वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक प्राधिकरणाकडे दिला आहे.

याशिवाय व्यावसायिक वापरासाठीच्या वीजबिलात 13 ते 14 टक्के वाढ करण्याचेही या प्रस्तावात नमूद आहे. वसुली आणि खर्च यातील ताळमेळ साधण्यासाठी ही वाढ महावितरणने मागितली आहे. महाराष्ट्र वीज नियामक प्राधिकरणाने या याचिकावर सुनावणीसाठी तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version