EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका?

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी  बॅलेट पेपरवर  निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी  मोठ्या प्रमाणात लोकांकडून  मागणी आली तर त्याचा विचार केला जाईल. असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकशाही सदृढ व्हावी, निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी यासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांनी एक परिषद आयोजित केली आहे या परिषदेला दहा देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार  असल्याचंही सहारिया म्हणाले.

विशेष म्हणजे या परिषदेत पाच विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यापैकी सोशल मीडियाचा वाढलेला दुष्परिणाम हा या परिषदेतील एक महत्वाचा विषय असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version