राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही – शरद पवार

राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड गाजला. तसेच राज ठाकरे यांनी सभेत सरकारच्या भाषणांचे व्हिडीओ दाखवत पोलखोल केले. त्यामुळे राज ठाकरेंचे भाषण केवळ महाराष्ट्रतच नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनले. राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुठून येतो अशा अनेक गोष्टींवरुन राजकीय नेत्यांनी टीका केली. तसेच भाजपाने निवडणूक आयोगाकडे राज ठाकरेंची तक्रार करण्यात आली. निवडणूक आयोगा मनसेला नोटीस बजावणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे समजते आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंची बाजू घेत आपले मत मांडले आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

तसेच त्यांच्या भाषणांचे व्हिडीओ दाखवत पोलखोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून निवडणूक आयोग मनसेला नोटीस बजावणार असल्याचे समजते आहे.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंची बाजू घेत आपली बाजू मांडली आहे.

मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला नसल्यामुळे निवडणूक आयोगाला हिशोब मागण्याचा अधिकार नाही.

राजकीय पक्षाने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसल्यामुळे सभा घेणे त्याचा लोकशाही अधिकार असल्याचे पवारांनी म्हटलं आहे.

आणीबाणीच्या काळात पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रभर कॉंग्रेसविरोधता प्रचार सभा घेतल्या होत्या.

सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना असल्यामुळे खर्चाचा हिशोब मागण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला सवाल केला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version