भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा ८ वा स्मृतिदिन आज ३ जून रोजी आहे. ८ व्या स्मृतिदिनानिमित्त दिवसभर गोपीनाथ गडावर कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आज गोपीनाथ गडावर होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळाले नाही. दोन वर्षानंतर गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांची गर्दी पाहिला मिळणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार रामरावजी ढोक महाराज यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन होणार आहेत. त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.
आज गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातील मान्यवर नेत्यांची ही उपस्थिती राहणार आहे . मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील दहा वाजता गोपीनाथ गडावर दर्शनासाठी येणार आहेत.आठव्या स्मृतिदिनाच्या या कार्यक्रमाच्या तयारीचा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला.गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.