चालकांना उन्हाच्या चटक्याने दिलासा

चालकांना उन्हाच्या चटक्याने दिलासा

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसां पासून सूर्य आग ओकत असुन जिल्ह्याचा पारा चढत असुन जिल्ह्याचा पारा ४३ डिग्री अंशांवर गेला असुन गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाने पारा चढत असल्याने गोंदिया शहरातील सिग्नल दुपारी दोन तास बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे. तर दुपारी २ ते ४ च्या दरम्यान उन मोठ्या प्रमाणात असल्याने गोंदिया शहरातील सिग्नल दोन तास बंद असणारा आहेत, या मुळे गोंदिया शहरातील लोकांना सूर्या पासून लागणाऱ्या चटक्यांपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. सिग्नल बंद असल्याने उन्हात उभे राहिल्यावर उन्हाचे चटके बसत असल्याने वाहतूक विभागाने हे निर्णय घेतले आहे. तर समोर आणखी पारा वाढल्यास सिगंल बंद ठेवण्याचे वेळ वाढविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version