‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठी अमूल्य योगदान’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठी अमूल्य योगदान’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर गर्दी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी, आरोग्य नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दुसरीकडे बाबासाहेबांना अभिवदन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी चैत्यभूमीवर ६५व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अभिवादन केले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्ली येथील संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version