पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपूल बंद केल्यानंतर आता रेल्वेने गोखले उड्डाणपूल पाडकामासाठी सलग पाच दिवस चार चार तासांचे अँप -डाऊन मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक १०,११, १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी मध्य रात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत असणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता.
त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले, मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात आला आहे.
रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरार ते चर्चगेट रात्री ११.४० आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री १२.४६ ची लोकल गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गांवरून धावणार आहे. ब्लॉक झाल्यानंतर अंधेरी ते विरार लोकल पहाटे ४.४० वाजता सुटणार आहे.
या लोकल जलद मार्गांवरून धावणार आहेत. चर्चगेट ते भाईदर रात्री ११.२७, ११.३८, १२.०९, १२.१६, १२.२८, १२.४३,नालासोपारा रात्री ११.४६, बोरिवली रात्री ११.५२,१ वाजता, विरार रात्री ११.५८, १२.२०, १२.५०, अंधेरी रात्री १२.३१
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.