राज्यातील सत्तासंघर्ष प्रचंड पेटला होता. त्यात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित असणारी राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपल्याची माहिती येत होती. परंतु आता सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून सत्तासंघर्षाचा निकाल उद्या असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींनी जोरदार वेग धरला असून इतके दिवस टांगणीला असलेला सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याचे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहेत. या निकालात नेमकं काय घडतंय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच १६ आमदारांच्या अपात्रतेचा उद्या निकाल कळणार आहे.
त्यामुळे उद्याच्या निकालात सरकार राहणार की कोसळणार असा प्रश्न उपस्थित राहिला असून याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.