राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाले आहेत. ‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल’ अशा स्वरूपाची धमकी ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.
या धमकीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तर, या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.