खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोबाईलवर धमकीचे फोन येत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना धमक्या येत आहेत. धमकी देणारी व्यक्ती स्वतःची ओळख विठ्ठल राव अशी करून देत आहे तसेच तिवसा येथून बोलत असल्याचे सांगत आहे.

नवनीत राणा यांना 088055 41949 या क्रमांकावरून धमकीचे फोन येत आहेत. ‘तू अनेकदा गर्दीच्या ठिकाणी जातेस. अशाच एखाद्या ठिकाणी मी चाकूने वार करेन, तुला लक्षात पण येणार नाही’; अशी धमकी देत नंतर अश्लील शिवीगाळ केली जात आहे. धमकी देणारी व्यक्ती वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version