कळवा रुग्णालयात मृत्यूचे तांडव, मनसे आक्रमक

कळवा रुग्णालयात मृत्यूचे तांडव, मनसे आक्रमक

ठाणे शहरातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळव्याच्या रुग्णालयात घडलेली घटना धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचे मनसेने सांगितले.

रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या संख्येन मृत्यू होत आहेत. ही गंभीर बाब आहे. प्रशासन काय करत आहे, असा जाब मनसेने विचारला आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला उपचार दरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत १२ तासात रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या आवारात मनसेने आंदोलन सुरू केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version