Maratha Reservation: अंतरवाली सराटीत दुर्दैवी घटना! मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आलेले बीडचे आंदोलक दशरथ रायकर यांचा झोपेतच मृत्यू झाला.
Maratha Reservation: अंतरवाली सराटीत दुर्दैवी घटना! मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून आलेल्या एका मराठा आंदोलकाचा झोपेतच मृत्यू झाल्याने आंदोलनस्थळी शोककळा पसरली आहे. मृत आंदोलकाचे नाव दशरथ रायकर (रा. संगम, ता. जि. बीड) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते इतर आंदोलकांसह अंतरवाली सराटी परिसरातील एका शेतात रात्री मुक्कामी होते. शुक्रवारी सकाळी इतर आंदोलक उठल्यानंतर दशरथ रायकर कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा. मात्र, नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आंदोलनाचे कार्यकर्ते आणि जरांगे पाटील यांचे समर्थक रुग्णालयात दाखल झाले. रायकर यांच्या निधनामुळे आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात असून, बीड जिल्ह्यातील मराठा समाजातही शोक व्यक्त केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version