Dahi Handi 2025: राज्यातील दीड लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण, सरकारकडून मोठी घोषणा

दहीहंडी 2025 निमित्त दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार, प्रीमियम सरकारकडून भरणार. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय, गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण.
Dahi Handi 2025: राज्यातील दीड लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण, सरकारकडून मोठी घोषणा

Dahi Handi 2025: महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. 16 ऑगस्ट 2025 रोजी गोविंदा पथकांच्या जल्लोषात हा पारंपरिक उत्सव साजरा होणार आहे. यंदा गोविंदांसाठी सरकारकडून एक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातील दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण आणि त्याचा प्रीमियम राज्य सरकार भरणार, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत मानाचा उत्सव मानला जातो. गेल्या काही वर्षांत दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यापासून गोविंदांच्या सहभागात मोठी वाढ झाली आहे. मात्र, मानवी थरांच्या ह्या खेळात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोविंदांसाठी विमा कवच देण्याची मागणी होत होती.

हेही वाचा: Shravan 2025: यंदाच्या श्रावणात 'या' 5 राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा; जाणून घ्या

भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी याच मुद्यावर विधानपरिषदेत आवाज उठवला. दरेकर यांनी सांगितले की, 'गोविंदा आणि गणेशोत्सव हे महाराष्ट्रातील पारंपरिक सण आहेत. त्यांच्यासाठी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, ही मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहोत.'या मागणीवर उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले, 'गोविंदा हा केवळ एक खेळ नाही, तो महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या वर्षी सव्वा लाख गोविंदांना विमा कवच देण्यात आले होते. यंदा हे प्रमाण वाढवून दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार असून, त्याचा प्रीमियम देखील सरकारच भरेल.'

हेही वाचा: अक्कलकोट बंद! शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरवर्षी दहीहंडी दरम्यान अनेक गोविंदा अपघातग्रस्त होतात. अशा परिस्थितीत त्यांना वैद्यकीय मदत आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी विमा कवच अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी सकारात्मक पाऊल उचलल्याने गोविंदांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

या निर्णयामुळे दहीहंडी उत्सव अधिक जोशात आणि सुरक्षिततेच्या वातावरणात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गोविंदांसाठी विमा संरक्षण हा निर्णय केवळ आर्थिक पाठबळ नाही, तर त्यांच्या कुटुंबांसाठीही एक दिलासा ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version