Cyclone Senyar : 29 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राज्यांवर चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावतय! महाराष्ट्रात काय परिस्थिती?

एकीकडे जोरदार पाऊस सुरु असताना उत्तर भारतामध्ये थंड हवेचा जोर हळुहळु वाढत असलेला जाणवतो आहे. अशातच आता अनेक राज्यांच्या हवामानात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.
Cyclone Senyar : 29 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राज्यांवर चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावतय! महाराष्ट्रात काय परिस्थिती?

पावसाळा जरी गेला असला तरी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे जोरदार पाऊस सुरु असताना उत्तर भारतामध्ये थंड हवेचा जोर हळुहळु वाढत असलेला जाणवतो आहे. अशातच आता अनेक राज्यांच्या हवामानात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे देशभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच अपडेट जारी केला असून पुढील पुढील 72 तास हे अनेक राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अवकाळी पावसाबाबत हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार मलेशियाच्या आसपास तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, याचं रुपांतर चक्रीवादळात होत असल्याचं हवामानखात्याने सांगितलं आहे.

हेही वाचा- Weather Update: हवामानात मोठा उलटफेर! दोन वादळांचा धोका, दक्षिणेत मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय परिणाम?

तसेच हे तयार होणार चक्रीवदाळ बंगालच्या उपसागराकडे वळत असल्यामुळे पुढील एक ते दोन दिवस आसपासच्या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाच संकट घोंगावत आहे. दरम्यान या चक्रीवदाळामुळे दक्षिणेकडील राज्यांसाठी पुढील 72 तास हे धोक्याचे असणार आहेत. या काळात ताशी 65 ते 100 किमी एवढ्या प्रचंड वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Weather Update : वादळ-वृष्टीचं महा-संकट! IMD चा मोठा अलर्ट जारी; महाराष्ट्रातही चिंता वाढली

29 नोव्हेंबरपर्यंत अंदमान, निकोबार बेट, तामिळनाडू, ओडिशा, आंध्रप्रदेश या राज्यांसह बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत उत्तर भारताच्या हवामानाबद्दल बोलायच झाल तर, महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडका वाढण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीमध्ये तापमानात घट झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version