राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती

राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केलीय.

राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version