रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कर्मचाऱ्याने केली मारहाण

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कर्मचाऱ्याने केली मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारताचा क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीसोबत एका पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्शन रोडवर ही घटना घडली आहे, शारू रोडवर रिवाच्या बीएमडब्ल्यू कारने कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक बसल्याने संतापलेला पोलीस कर्मचारी त्याच्या मोटरसायकलवरून उतरला आणि त्याने रिवा जडेजाला मारहाण केली.

संजय अहीर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने गाडीवरून उतरल्यावर कोणताही विचार न करता रिवा जडेजाला मारहाण करण्यास सुरुवात केली, या मारहाणीत रिवा जडेजा जखमी झाली आहे.

याप्रकरणी संजय अहिर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जामनगरमधील पोलीस अधीक्षकांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version