स्फोट झालेल पार्सल, सरहद संस्थेच्या संजय नहर यांच्यासाठी

स्फोट झालेल पार्सल, सरहद संस्थेच्या संजय नहर यांच्यासाठी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये कुरियर कंपनीच्या कार्यालयातील एका पार्सलमध्ये भिषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कंपनीचे कर्मचारी रात्री 10 च्या सुमारात एक पार्सल सोडत होते, त्यावेळी अचानक हा स्फोट झाला. पार्सलमध्ये झालेल्या या स्फोटाने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. 

सुत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांना पाठवण्यात आलेल्या कुरियर पार्सलमध्ये हा स्फोट झाला. संजय नहार हे सरहद संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था जम्मू काश्मीरमध्ये शांतीसाठी प्रयत्न करते. 

सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version