Rahul Gandhi’s Letter to Devendra Fadnavis : "हे विद्यार्थी दान मागत नाहीत" आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
Rahul Gandhi’s Letter to Devendra Fadnavis : "हे विद्यार्थी दान मागत नाहीत" आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावर आहेत. अशातच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. वसतिगृहातील वयाची मर्यादा, असुरक्षित सुविधा, अपमानास्पद नियम आणि विद्यार्थिनींसाठीच्या अमानवीय अटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय व सुरक्षित वातावरण देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण करत असल्याचं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. पुण्यातील ‘Echo of Students’ या कार्यक्रमाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थिनींच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

हेही वाचा- Chandrashekhar Bawankule On Mahayuti : जिल्ह्यातील निधीवाटपाचा तिढा सुटला, तर महायुतीचा निधी वाटपाट फॉर्मुला ठरला; बावनकुळेंनी सगळं सांगितलं

वसतिगृहांमध्ये 30 वर्षांची अनावश्यक वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा तपासण्यासारख्या अमानवी तरतुदी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. दुर्गम गावांमधून शिक्षणासाठी आलेले हे विद्यार्थी सरकारकडे दान किंवा सहानुभूती मागत नाहीत, तर त्यांचे हक्क मागत आहेत, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रातून केली आहे.

राहूल गांधी यांनी पत्रात काय लिहलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी उपोषणावर आहेत. पुण्यातील ‘स्कूल्स इको’ कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी वसतिगृहांमधील 30 वर्षांची अनावश्यक वयोमर्यादा, अपमानकारक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांसाठी गर्भधारणा चाचण्या यांसारख्या अमानवीय तरतुदींबद्दल माहिती दिली. दुर्गम गावांमधून आणि शहरांमधून आलेले हे विद्यार्थी दान मागत नाहीत; ते त्यांचे हक्क मागत आहेत. आम्ही अपेक्षा करतो की आपण त्यांना वैयक्तिकरित्या भेटावे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version