वृत्तसंस्था, मुंबई
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. मेरी कोमने अंतिम फेरीत नॉदर्न आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा 5-0 ने पराभव केलाय.
मेरी कोमच्या या विजयाने भारताच्या खात्यात विजयाची भर पडली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या 35 वर्षीय मेरी कोमनं श्रीलंकेच्या मनुषा दिलरुक्षीवर विजय मिळवला होता.
मेरी कोमच्या या विजयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरु शुभेच्छा दिल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.