राज्यात संचारबंदीला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्र्याकडून घेतली जाणार महत्वपूर्ण बैठक

राज्यात संचारबंदीला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्र्याकडून घेतली जाणार महत्वपूर्ण बैठक

मुंबई : राज्यात संचारबंदीला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनास काही महत्वाचे निर्देश दिले जाऊ शकतात असे सूत्रांकडून समजते आहे.

सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत संचारबंदीच्या नियमावलीशी संबंधित काही महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री प्रशासनास देतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. राज्यात आज रात्री आठ वाजेपासून संचारबंदीला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार गरजुंना मदत देण्यासोबत काही निर्बंध राज्य सरकारने घातले जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version