फक्त नाव दिल्यानं संघर्ष होत नाही; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

फक्त नाव दिल्यानं संघर्ष होत नाही; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते संघर्षयात्रा काढत आहेत.

 

केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

 

विरोधकांची संघर्षयात्रा असेल, तर आम्हीही संवादयात्रा काढू, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

 

पिंपरीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

पिंपरीत पवारांचा बुरुज कोसळला, सोलापुरात मोहिते पाटलांचा बुरुज कोसळला, तसंच सांगली, कराड, इस्लामपूरसह राज्यभरात हीच परिस्थिती आहे.

 

लोकांपासून दूर गेल्यामुळे हा परिणाम असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 22 एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेली सर्व तूर घेऊ. असं आश्वासन देखील मुख्यंत्र्यांनी यावेळी दिले.

 

पण, शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्याची तूर अजिबात घेणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version