महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

31 ऑक्टोबरच्या आधी गरजू शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असून ही इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

यावर अभ्यास करण्यासाठी चार महिन्यांचा वेळ घेण्यात आल्याचा दावाही मुख्यंत्र्यांनी केला आहे. 

 

मागच्या काळात कर्जमाफीसाठी घोटाळा झाला होता. तो होऊ नये म्हणून आयटी बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

 

जे शेतकऱ्यांचे खरे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करणाऱ्यांशी चर्चा होऊ शकत नाही, असे

मुख्यमंत्री म्हणाले.

 

तसेच संपकाळात 307 बाजार समित्यांपैकी 300 कार्यरत होत्या. सात पैकी तीन बाजारात समित्यांनी बंद पाळला. तर बाजार समित्या 4 सुट्टीवर होत्या, असा दावाही

मुख्यमंत्र्यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version