जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबात मोठी घोषणा केली आहे. .
सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी होणार असल्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 हजारांपर्यंत बोनस मिळणार आहे. सुमारे 92लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीवर 37 हजार कोटींचा
भार पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
– राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार
– सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारने घेतलेला अभूतपूर्वक आहे
– महाराष्ट्र सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केलेय
– दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी
– 90 टक्के शेतकऱ्यांची सातबारा कोरा करणार – मुख्यमंत्री
– 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
– नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के थेट अनुदान त्यांच्या खात्यात जमा करणार
– 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची मदत मिळणार आहे.
– देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आज महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
– छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.