जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीय. राज्यपाल सी विद्यासागर यांनी आपल्या अभिभाषणात विविध योजनांची माहिती दिली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणाची सुरुवात इंग्रजीत झाल्याने विरोधी पक्षनेत्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी राज्यपालांचे भाषण इंग्रजीत होते. त्याचा अनुवादही मराठीत नव्हाता. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत भवनाच्या बाहेरही घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारवर ही नामुष्की ओढवली.
सरकारकडून मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मराठीच्या अनुवादाऐवजी अभिभाषणाचे गुजराती अनुवाद सुरुवातीला ऐकवला जात होता’ असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली.
राज्यपालांच्या अभिभाषणाचं मराठी भाषांतर न होणे ही गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी विधान सभा अध्यक्षांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.