गोदावरी नदीच्या पात्राची स्वच्छता सुरु

गोदावरी नदीच्या पात्राची स्वच्छता सुरु

गेल्या तीन चे चार दिवसापासून गोदापात्र स्वच्छता मोहीम घेण्यात आले आहे एका विशिष्ठ स्कीमर मशीनद्वारे नदीची स्वच्छता मोहीम सुरू आहे. सुमारे रोज ८ ते १० टन पाणवेली काढण्याचे काम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाणवेली तयार झाल्या होत्या. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार आणि उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅश स्किमर मशीनद्वारे गोदावरीची ही स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत दररोज सुमारे आठ ते दहा टन पाणवेली हटविण्याचे सध्या हे काम चांदशी शिवार येथे सुरु आहे. सुरुवातीला शहरातील होळकर पुल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्कीमर मशीनद्वारे पाणवेली काढण्यात आली. स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या या कामावर आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गोदावरी नदी आणि तिचे पात्र नितळ, स्वच्छ राहण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह सामाजिक संस्था, एनसीसी कॅडेट्स यांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहिम राबवली जात आहेत. तसेच यादरम्यान प्लास्टिक बंदीबाबतही जनजागृती करण्यात आली. यापुढेही सातत्याने स्वच्छता मोहिम राबवून, जनजागृती करुन गोदापात्र स्वच्छ ठेवण्याची दक्षता घेतली जाणार असल्याचे उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version