‘स्पाय बलून’ च्या साहाय्याने चीनचे मोठे षडयंत्र सुरु आहे. अमेरिकेने चीनचे हे षडयंत्र उघड केले आहे. परंतु, चीनने अमेरिकेचे आरोप फेटाळले आहेत.
चीनने ४० देशांमध्ये स्पाय बलून सोडले आहेत. चिनी लष्कराच्या हाती याचे सर्व नियंत्रण आहे. स्पाय बलूनच्या मदतीने चीनची हेरगिरी सुरु असल्याचे समोर आहे आहे. अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडल्यानंतर त्यांच्या अवशेषांमधून चीनचा मोठा कट उघड झाला आहे. चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यात सक्षम असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने अमेरिकेप्रमाणे ४० देशांमध्ये असे स्पाय बलून सोडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये आकाशात फुगा उडताना दिसला. हा चीनचा स्पाय बलून असल्याचे अमेरिकेने सांगितले होते. पण, अमेरिकेचे आरोप चीनने फेटाळले आहेत.
दरम्यान, अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडला त्यानंतर त्याच्या मिळालेल्या अवशेषांमधून अमेरिकेच्या हाती चीनविरोधात ही माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.