‘याच मैदानात फुसका आपटीबार येवून गेला’

‘याच मैदानात फुसका आपटीबार येवून गेला’

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रत्नागिरीमधील खेडमध्ये सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांची सभा झालेल्या गोळीबार मैदानावरून मुख्यमंत्री शिंदे यांची तोफ धडाडली. माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. उद्धव गटाच्या सभेतील गर्दीची तुलना आमच्य गर्दीशी नको. खेडच्या याच गोळीबार मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच याच मैदीनात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर हे आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. मात्र, तोच-तोच थयथयाट आणि तीच आदळआपट याला काय उत्तर देणार, असे ते म्हणाले.

‘राज्याला फिरणारा मुख्यमंत्री मिळाला’

मुख्यमंत्री शिंदे यांनी शेडच्या सभेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. मी घरात बसणाऱ्यांपैकी नाही तर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मी लोकांमध्ये जातो, मला त्यांना भेटायला आवडते. शिंदे-फडणवीस सरकार हे देणारं सरकार आहे, घेणार नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. मी मुख्यमंत्री होणार हे मला वाटलं नव्हतं. मात्र, माझ्या पाठीशी सर्व आले आणि आज मी मुख्यमंत्री झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मला मुख्यमंत्री केलं. त्यामुळे आता राज्याला फिरणारा मुख्यमंत्री मिळाला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version