मुख्यमंत्री शिंदे नवी दिल्लीत

मुख्यमंत्री शिंदे नवी दिल्लीत

शिवसेनेचे आमदारांना फोडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांनाही आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहे. मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या वेळी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना वगळून दिल्लीत दाखल झाले आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहे. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या दौऱ्यात शिंदे हे देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळली आहे. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयात येत्या २० जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देते, त्यानंतर काय भूमिका मांडली पाहिजे, याची चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, ‘आमच्याकडे १२ नव्हे तर १८ खासदार असल्याचा, गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्व खासदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पण यातील सहा खासदार अद्यापही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे या सहा खासदारांपैकीही काही खासदार आपल्याकडे आणण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आपण दिल्लीत आलो असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या दृष्टीनेही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version