मुंबईच्या डोंगरी भागात झालेल्या केसरभाई या चार मजली इमारतीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी 11:40 वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळ्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी लागणारा खर्च सरकार करणार असल्याचेही म्हटलं आहे.
मंगळवारी झालेल्या इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
केसरबाग ही चार मजली इमारत 100 वर्ष जूनी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून मदत जाहीर केली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
तसेच जखमींच्या उपचारासाठी लागणारा खर्च सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.