Chhatrapati Sambhajinagar Crime : फॉर्म भरण्यासाठी घराबाहेर पडली आणि थेट पुलावर….; तरुणीने केलेल्या कृत्याने सर्वच हादरले

Shocking Incident Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 18 वर्षीय तरुणीने याच उड्डाणपुलावरुन खाली उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलेले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : फॉर्म भरण्यासाठी घराबाहेर पडली आणि थेट पुलावर….; तरुणीने केलेल्या कृत्याने सर्वच हादरले
अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीचं टोकाचं पाऊल.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील एएस क्लब उड्डाणपुलावरुन एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अवघ्या 18 वर्षीय तरुणीने याच उड्डाणपुलावरुन खाली उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलेले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तरुणीने का घेतला असा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी काल दुपारी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी न जाता थेट एएस क्लब उड्डाणपुलावर पोहोचली. काही वेळ पुलावर थांबल्यानंतर तिने कोणालाही काही समजण्याच्या आधीच उड्डाणपुलावरुन खाली उडी घेतली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत तिचा जीव वाचला आहे. मात्र, या घटनेती ती गंभीर जखमी झाली. तरुणीच्या दोन्ही पायांच्या मांडीची हाडे फ्रॅक्चर झाली असून चेहऱ्याला आणि जबड्याला मोठी दुखापत झालेली आहे.

हेही वाचा-CRIME : प्रियकरासोबत गेलेली पत्नी 3 महिन्यांनी परतली! आधी नाकाला चावा, नंतर गुप्तांग कापले; सासूसमोरच…

घटना समोर येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी अशोक थोरात आणि अजित परशूवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करत तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलेली आहे.

… तरीही उचललं टोकाचं पाऊल
संबंधित तरुणीने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बारावीनंतर तिला कायद्याचे शिक्षण घेऊन वकील व्हायचे होते, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिलेली आहे. हुशार तसेच अभ्यासू असलेल्या तरुणीने असे पाऊल का उचलेले,याबाबत तिच्या घरच्यांना आणि ओळखीतील नातेवाईकांना धक्का बसला आहे. तिने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे नेमके कारण काय आहे ते अजूनही समजू शकले नाही.

हेही वाचा-Wardha Crime : वर्ध्यात संतापजनक घटना! रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 19 वर्षीय तरुणीला मदतीच्या नावाखाली नेलं अन् पुढे घडलं धक्कादायक

कौटुंबिक वाद, शिक्षणाचा ताण की अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलीस सध्या करत आहे. वाळून एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. सध्या तरुणीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टीप: नैराश्य किंवा अडचणीत असाल तर जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा समुपदेशन केंद्राची मदत घ्या.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number