Wardha Crime : वर्ध्यात संतापजनक घटना! रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 19 वर्षीय तरुणीला मदतीच्या नावाखाली नेलं अन् पुढे घडलं धक्कादायक

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच वर्ध्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

Wardha Crime : वर्ध्यात संतापजनक घटना! रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 19 वर्षीय तरुणीला मदतीच्या नावाखाली नेलं अन् पुढे घडलं धक्कादायक
वर्धा हादरलं, 19 वर्षांय तरुणीवर 6 नराधमांकडून सामूहिक अत्याचार

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच वर्ध्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. 23 सप्टेंबरच्या रात्री वर्धा रेल्वे स्थानकावर आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर मदतीच्या बहाण्याने काही संशयित युवकांनी स्टेशन परिसरातून बाहेर नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वर्धा रेल्वे स्थानकाच्या परिसरातून बाहेर नेऊन युवतीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे वर्ध्यात दाखल झाले असून रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणी चंद्रपूर इथं तिच्या काकांकडे जाण्यासाठी मंगळवारी घरातून निघाली होती. तिच्या वडिलांनी तिला सोनेगाव (बेला) येथील बसस्थानकावर सोडलं. त्यानंतर ती बसने चंद्रपूरला गेली होती.

हेही वाचा- Vineet Minocha: कानपूर प्रकरणात नवा ट्विस्ट! व्यापाऱ्याला संपवण्याची सुपारी सुनेने नाही तर मुलानेच दिली? मारेकऱ्यांना सांगितलं, ‘बायकोचं नाव घ्या..’

चंद्रपूरहून जयंती एक्स्प्रेसने वर्ध्याकडे येताना ती सेवाग्राम रेल्वे स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास उतरली. त्यानंतर 23 सप्टेंबरच्या सायंकाळी युवती वर्धा रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही संशयित युवकांनी मदतीच्या बहाण्याने तिला रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर नेले. त्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पीडिता आदिवासी समाजातील असल्याने विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी सहा जणांची पीडितेनं ओळख पटविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number