Chat GPT Women Users Lead: ChatGPT वापरात महिलांचा दबदबा; तरुण वर्ग सर्वाधिक सक्रिय

ओपनएआयच्या नव्या अहवालानुसार, ChatGPT वापरणाऱ्या महिलांची संख्या आता पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. 2022 मध्ये जिथे 80% युजर्स पुरुष होते, तिथे जुलै 2025 पर्यंत महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे
Chat GPT Women Users Lead: ChatGPT वापरात महिलांचा दबदबा; तरुण वर्ग सर्वाधिक सक्रिय

ओपनएआयच्या (OpenAI) नव्या अहवालाने ChatGPT वापरकर्त्यांच्या सवयींबाबत महत्त्वाचे निष्कर्ष समोर आणले आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रात पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे मानले जात होते, मात्र आता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा किंचित पुढे गेली आहे. युजर्सच्या नावांचे विश्लेषण करून लिंगाचे अंदाज बांधण्यात आले असून जून 2025 च्या आकडेवारीनुसार महिला नावांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. सुरुवातीला, 2022 मध्ये ChatGPT वापरणाऱ्यांपैकी तब्बल 80 टक्के पुरुष होते. पण जुलै 2025 पर्यंत महिलांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे.

डिसेंबर 2022 मध्ये ChatGPT चे लाँचिंग झाले आणि केवळ तीन वर्षांत जगभरात त्याचे 70 कोटींहून अधिक युजर्स झाले. हार्वर्ड व ड्यूक विद्यापीठांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या संशोधनात दर सेकंदाला सुमारे 29 हजार संदेश या एआय चॅटबॉटकडे येतात, असे नोंदले आहे.

वापराच्या स्वरूपावर नजर टाकल्यास जवळपास 40% युजर्स व्यावसायिक लेखन किंवा ईमेल मसुद्यांसाठी ChatGPT वर अवलंबून आहेत. सुमारे 29% लोक वैयक्तिक मार्गदर्शन किंवा सल्ल्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. माहिती शोधणाऱ्यांचे प्रमाण 24% आहे.

वयोगटाच्या दृष्टीने पाहता, 18 ते 25 वर्षांतील तरुण सर्वाधिक सक्रिय असून एकूण संदेशांपैकी तब्बल 46% हाच गट पाठवतो. याशिवाय कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ChatGPT चा प्रसार जलदगतीने वाढतो आहे.

तज्ज्ञांच्या मते, ChatGPT सारखी एआय साधने केवळ दैनंदिन सोयीसाठीच नाहीत तर सामाजिक व आर्थिक बदलांना गती देणारी ठरत आहेत. तंत्रज्ञानातील या नव्या लाटेमुळे ज्ञान, सर्जनशीलता आणि संवाद साधण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती होत असून, पुढील काळात त्याचा परिणाम अधिक व्यापक स्वरूपात दिसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version