ओबीसींचे १७ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन

ओबीसींचे १७ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले असून सरकार, विरोधक आमनेसामने आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मयामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून येत्या १७ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा ओबीसी जनमोर्चाचे अध्यश्र बाळासाहेब सानप यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. तसे न झाल्यास येत्या १७ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयाकडे तात्काळ देण्याची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे.

‘आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे ओबीसींवर अन्याय’ – पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकापुढे ढकलण्याची मागणी भाजप नेते पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडे पैसे नसतील तर आम्हाला सांगा, ओबीसींसाठी पैसा गोळा करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात ओबीसी समाज तीव्र भूमिका घेईल, असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version