‘शिझूका’ मांजरीचं सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण

‘शिझूका’ मांजरीचं सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण

मुक्या प्राण्यांवर दया करा, अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती असली तरी अलीकडे प्राण्यांप्रती माणसांच्या संवेदना बोथट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बुलढाण्यात मात्र प्राणीप्रेमाचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. मरायला टेकलेल्या एका पाळीव मांजरीवर पशुचिकित्सालयाच्या टीमने प्रथमच सीझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती केली आहे.

 

बुलढाण्यातील इकबाल नगर येथील प्यार मोहम्मद यांची मांजर ‘शिझूका’ हिला प्रचंड प्रसूती वेदना होऊ लागल्या. या वेदनांची जाणीव झाल्यामुळे त्यांनी शिझूकाला तात्काळ येथील पशुचिकित्सालयात दाखल केले.

 

डॉक्टरांनी सलाईन लावून तसंच इंजेक्शन देऊनही मांजरीच्या कळा थांबत नव्हत्या. शिझूका अगदी मरणपंथाला लागली होती. मांजरीच्या प्रसूतीवेदना तीव्र झाल्या होत्या.

त्यामुळे पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास मोरे, डॉ. डी. एन काळे, डॉ. आर. बी. पाचरणे, डॉ. बचाटे, परीचर अशोक गवई ही टीम शिझूकावरील शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाली. सहजा-सहजी औषधालयातून उपलब्ध होत नसलेले ‘इपीडोसीन’ इंजेक्शनही डॉक्टरांनी मिळवून मांजरीला भूल दिली.

त्यानंतर सुमारे पाऊण तास तिच्यावर अक्षरशः एका महिला रुग्णासारखी सिझेरियन शस्त्रक्रिया केली.

ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. तिच्या गर्भाशयातून 4 पिलांना बाहेर काढण्यात आलं. दुर्दैवाने यातील 3 पिल्ले दगावलेली होती. 1 पिल्लू मात्र सुखरूप आहे.

मांजरीवरील सिझेरियन प्रसूतीची घटना ही बुलढाण्यात प्रथमच घडली आहे. हजारो प्राण्यांतून एखाद्या वेळेस अशी घटना घडते, असे डॉक्टरांचं म्हणणं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version