रेल्वे प्रवाशांसाठी खास दिवाळी गिफ्ट

रेल्वे प्रवाशांसाठी खास दिवाळी गिफ्ट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पश्चिम आणि मध्य रेल्वे दिवाळीनिमित्त प्रवाशांना एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम रेल्वेवर येत्या 1 ऑक्टोबरपासून 32 नव्या रेल्वे धावणार आहेत. मध्य रेल्वेवरही पुढील महिन्यापासून 40 नव्या फेऱ्या वाढवण्याची योजना आहे.

 

पश्चिम रेल्वेवरच्या नव्या गाड्यांची सेवा अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान असणार आहे. या 32 गाड्यांपैकी 9 गाड्या पाचव्या लाइनवर धावणार आहेत. यासोबतच काही 12 डब्यांच्या गाड्या 15 डब्बा करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी दिली आहे.

 

सध्या 15 डब्यांच्या 42 गाड्या आहेत, तर 1 ऑक्टोबरबासून 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या 54 होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version