पवारांसोबतच्या फोटोवर बृजभूषण सिंह यांचा खुलासा

पवारांसोबतच्या फोटोवर बृजभूषण सिंह यांचा खुलासा

मनसेकडून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, आता मनसेकडून ट्विट करण्यात आलेल्या फोटोवर बृजभूषण सिंह यांनी खुलासा केला आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले, शरद पवार हे मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष हे आण शरद पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. मनसेकडून ट्विट करण्यात आलेला हा फोटो तीन वर्षांपूर्वी पुण्यातील कार्यक्रमाचा आहे. कुस्ती क्षेत्रात जे काम झाले आहे, ते माझ्यामुळे झाले असल्याची भावना शरद पवार यांची आहे. त्यामुळे कुस्तीसाठी केलेल्या कामाचे शरद पवारांकडून कौतुक करण्यात आले असल्याचेही सिंह म्हणाले.

तसेच, शरद पवारांसोबत माझे चांगले संबंध असल्याचा मला अभिमान आहे. शरद पवार आजही अयोध्येत आले तर त्यांना मी प्रणाम करेल. माझ्यासाठी पवार हे एक चांगले नेते आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असा टोलाही बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, मनसेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पार पडलेल्या सभेत केला. तर, मनसे नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बृजभूषण आणि शरद पवार तसेच सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले. हा फोटो मनसे नेते गजानन काळे आणि सचिन मोरे यांच्याकडून ट्विट करण्यात आला. हा फोटो कुस्ती स्पर्धेतील असल्याचा स्पष्ट होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version