‘भाकरी फिरवावी लागणार’

‘भाकरी फिरवावी लागणार’

अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागेल, अशा कानपिचक्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरातून पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, अजित पवारांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. नंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला असला तरी नेतृत्वात बदल करणार असल्याचे सांगितले होतं. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला आहे. महापालिका, नंतर लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे आणि उमेदवारांचे भवितव्य काय राहील, याकरिता पक्षाच्यावतीने एक गोपनीय सर्वे करण्यात आला होता. या सर्वेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचेसुद्धा मत जाणून घेण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version