देखावा साकारताना अखेर त्याला आपला जीव गमवावा लागला

देखावा साकारताना अखेर त्याला आपला जीव गमवावा लागला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या रामटेकमध्ये वैकुंठ चतुर्दशीनिमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेदरम्यान शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारताना गळ्याला फास लावून एकाचा मृत्यू झाला होता. गांधी चौकातून यात्रा जात असतांना अचानक ट्रॉलीला धक्का बसला आणि त्यात या कलाकाराचा मृत्यू झाला होता.

मनोज धुर्वे असं या मृत कलाकाराचे नाव असून ट्रॉलीला धक्का बसताच तो खाली कोसळला. तातडीने मनोजला रामटेकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version