Bombay High Court: तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय! मुंबई हायकोर्टाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्द; नव्याने होणार परीक्षा

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक भरती टंकलेखन परीक्षा रद्द केली आहे.
Bombay High Court: तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय! मुंबई हायकोर्टाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्द; नव्याने होणार परीक्षा

मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठांतील लिपिक पदभरती प्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ ऑगस्ट रोजी पार पडलेली टंकलेखन परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली असून, नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च न्यायालय प्रशासनाने केली आहे.या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या सुविधांमुळे मोठा गोंधळ उडाला होता. अनेक उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर कीबोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याची, सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याची आणि योग्य आसनव्यवस्था नसल्याची तक्रार केली होती. काही ठिकाणी उमेदवारांना अत्यंत कमी जागेत संगणकावर टंकलेखन करावे लागल्याचेही समोर आले होते.

या गैरसोयीमुळे कल्याण, छत्रपती संभाजीनगरसह काही शहरांतील परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि संपूर्ण प्रक्रियेबाबत फेरविचार करण्याची मागणी जोर धरू लागली होती.उच्च न्यायालयाच्या प्रबंधक (कार्मिक) कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा सखोल विचार करून टंकलेखन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक सूचना लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची जाहिरात डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयात रिक्त आणि पुढील दोन वर्षांत रिक्त होणाऱ्या पदांसह एकूण ८३० लिपिक पदांसाठी भरती होणार आहे. त्याचबरोबर नागपूर खंडपीठात १६६, तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ३३६ पदे भरली जाणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version