मुंबई पालिकेसाठी भाजपाचं ‘मिशन १५०’

मुंबई पालिकेसाठी भाजपाचं ‘मिशन १५०’

सर्वच पक्ष भावी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु पालिका निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर मुंबई पालिकेसाठी भाजपाचं ‘मिशन १५०’ सुरु झाले आहे.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. तसेच, महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदी खांदेपालट करणार असल्याचेही समोर आले आहे. तर, भाजपा अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर अली आहे. गरज भासल्यास वॉर्ड आणि जिल्हाध्यक्षही बदलणार असल्याचेही कळत आहे.

मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाची मिशन १५० साठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. महिन्याभरात आढावा घेऊन पन्ना प्रमुख, बुथप्रमुख स्तरावर अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देणार असून गरज भासल्यास वॉर्ड आणि जिल्हा अध्यक्षही बदलणार आहेत. राज्याच्या प्रदेश कार्यकारिणी प्रमाणे मुंबई कार्यकारिणीत महिनाभरात मोठे बदल अपेक्षित आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version