नाशिकमधील मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणासंदर्भात एक अपडेट समोर येत आहे. पती नीलेश जेजुरकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई नाका- द्वारका परिसरातून गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. मुंबई हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टातून त्याला दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी नीलेश जेजुरकरला शरण येण्याचे आवाहन त्याला केले होते.मात्र, तो शरण आला नव्हता. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे.
नेमक प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी, डॉ.नीलेश जेजुरकर यांच्या पतीने आत्महत्या केली होती. डॉ.नीलेश जेजुरकर हे नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करतात.मात्र, त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तक्रार होती. त्यानंतर डॉ.नीलेश जेजुरकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टामध्येही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही ठिकाणांहून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितले होते. मात्र, ते शरण आले नाहीत.
मात्र, आता नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत काल रात्री त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.