सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयाने मारहाण

सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयाने मारहाण

सोलापुरातील काही संघटना तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जात असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन जातींत तेढ निर्माण करून सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणास बुधवारी (दि. ७ जून) दुपारी मारहाण करण्यात आली आहे. १५ जणांनी या तरुणाला लव्ह जिहादच्या संशयातून मारहाण केली. याबाबत पीडित तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पीडित तरुणाने लव जिहादचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version