इगतपुरीत गोवंश तस्करीच्या संशयावरून मारहाण

इगतपुरीत गोवंश तस्करीच्या संशयावरून मारहाण

नाशिकच्या इगतपुरीत ८ जूनला रात्रीच्या सुमारास गोवंश तस्करी वाहतूकीच्या संशयावरून जमावकडून तिघांना मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कसारा परिसरात घडली. जीव वाचविण्याच्या उद्देशाने अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एकाचा दरीत पडल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

गोवंश तस्करीच्या संशयावरून १५ ते १६ जणांनी केलेल्या मारहाणीत लुकमान अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी झाला आहे. याप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य संशयित आरोपी फरार आहेत. ही घटना ८ जून रोजी घडली पण १० जून रोजी लुकमानचा मृतदेह सापडल्यावर ही घटना उजेडात आली. तर घटनेच्या दिवशी अन्य जखमींना मारेकऱ्यांनी पोलीस ठाण्यात आणलं होतं. परंतु पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. गोवंश तस्करी करत असलेल्या संशयावरून या जमावाने प्रथम कसारा इथे जीप अडवली आणि ईगतपुरीला आणली. मुंबई महामार्गावर जीपमधील तीन जण आणि स्थानिक १५ ते १६ जण यांच्यात बाचाबाची झाली. त्यात जबर मारहाण झाल्याने लुकमान याचा मृत्यू झाला, त्याचा मृतदेह घटनास्थळापासून दूर आढळून आला. दरम्यान ही घटना ८ जून रोजी घडली होती, हा प्रकार मॉब लिचिंगची असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आणि मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version