जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
महाराष्ट्र सरकारने केलेल्या कथित ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर आता अनेक महिन्यांनंतरही या योजनेतील अनेक घोळ समोर येता आहेत. नागपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.
कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. आणि 31 मार्चपर्यंत कर्ज भरायला सांगितलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून ‘ही नेमकी कसली कर्जमाफी आहे’, असा संतप्त सवाल हे शेतकरी विचारत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी जाहीर करताना 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, असं सांगितलं होतं. याबाबत ‘मी लाभार्थी’ ही प्रचारमोहिमही शासनाकडून राबवण्यात आली. पण या योजनेचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा झाला, याबाबत अजुनही प्रश्नचिन्ह आहे.
सरकार आता या तक्रांरींची दखल घेत संबंधित बँकांना सूचना करणार का, हे पाहावं लागेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.