जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रचा सुपुत्राला वीरमरण आलंय. औरंगाबादमधील वैजापूरचे जवान किरण थोरात पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेत. 11 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटीत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. यावेळी प्रत्युत्तर देताना जवान किरण थोरात यांना वीरमरण आलंय.
त्यांच्या पश्चात त्यांची आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे. गेल्या आठवड्यात पाकच्या गोळीबारात परभणी पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शुभम मुस्तापूरे शहीद झाले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.