रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला; राष्ट्रवादीतर्फे आरोपींना अटक करण्याची मागणी

रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला; राष्ट्रवादीतर्फे आरोपींना अटक करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांच्या गाडीची तोडफोड झाली मात्र सुदैवाने रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनात देण्यात आली आहे.

रक्षा खडसेंचा तीव्र निषेध

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी निषेध व्यक्त केला. ‘पक्ष कोणताही असो, मात्र एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे आणि महिलांवर अशा पध्दतीने हल्ले होत असतील तर ही अत्यंत चुकीचे आहे,’ असे त्या म्हणाल्या. या संदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षकांसोबत बोलणे झाले असून संशयितांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. राजकारणात विरोध असू शकतो मात्र अशा पध्दतीने हल्ले करण्याचा प्रकार निंदनीय असल्याच्या खासदार रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version